जर कोणाला ‘महात्मा’ ही उपाधी घेण्याचा अधिकार असेल, तर तो केवळ महात्मा फुले यांनाच आहे!
सत्यशोधक समाजाद्वारे एका नवीन समाजव्यवस्थेची निर्मिती करणे, ही त्या काळातील मोठी घटना होती. समाजावर धर्माचा प्रचंड प्रभाव होता. अशा काळात धर्माची चिकित्सा करणे, धार्मिक बाबींचे टीकात्मक विश्लेषण करणे आणि धर्मामुळे निर्माण झालेल्या मानवी असमानतेला विरोध करणे, हे एक अतिशय कठीण कार्य होते. समाजातले जातीय व धार्मिक भेद संपवून सर्वजण समतेने एकत्र नांदावेत, हाच सत्यशोधक समाजामागे फुल्यांचा विचार होता.......